सीआरपीएफ जवानाला हेरगिरी प्रकरणी अटक   

एनआयएची दिल्लीत कारवाई

नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) जवान मोती राम जाट याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआए) अटक केली. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील संवेदनशील माहिती तो पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्‍यांना २०२३ पासून तो देत असल्याचे उघड झाले. जाट हा उपनिरीक्षक आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्‍यांकडून पैसे घेऊन तो त्यांना संवेदशील माहिती पुरवत होता. जाट याला नवी दिल्लीतून पकडण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांची दलातून तातडीने हकालपट्टी केल्याची माहिती देण्यात आली. समाज माध्यमांच्या माध्यमातून तो हेरगिरी करत असल्याचे उघड झाले होते. आता एनआयएने कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा त्याला ६ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.  

 

Related Articles